शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? ‘ॲग्रीस्टॅक’ […]
विदर्भ
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगला होळी उत्सव
जिंतुर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत मोहक नृत्य सादर करत होळीच्या रंगात रंग भरले. या अनोख्या उत्सवात राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सहभाग घेतला. बंजारा समाजाच्या भगिनींच्या आग्रहास्तव त्यांनी पारंपरिक वेष परिधान करून नृत्याचा आनंद घेतला. पारंपरिक लेंगी गीते, नृत्य आणि रंगोत्सवाच्या जल्लोषात होळी […]
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी; फिल्म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नवी दिल्ली, १३ : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual […]
सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण
मुंबई, दि. १४ : राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्यामुळे […]
जिल्ह्यात विकासाचा नवा अध्याय – प्रेक्षागृह, विश्रामगृह आणि प्रशासकीय सुविधांना अर्थसंकल्पीय मंजुरी
गडचिरोली दि .13: राज्याच्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने मोठा निधी मंजूर करत जिल्ह्यात विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. रस्ते विकासासाठी 500 कोटी निधी मंजुरी सोबतच प्रेक्षागृह, विश्रामगृह, प्रशासकीय इमारती आणि महसुली विश्रामगृह उभारणीसाठी एकूण ८०.१८ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्ताव मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला आहे. *प्रेक्षागृह (Auditorium) उभारणीस मंजुरी* […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, 13 मार्च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा […]
मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य योजनांचा गावोगावी प्रचार
गडचिरोली दि.१२: जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून या मल्टीमीडिया चित्ररथाला रवाना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, संजय गांधी योजनेचे तहसीलदार मोहनिश शेलवटकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक मान्यवर […]
गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींचा निधी मंजूर
गडचिरोली दि. 12 : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनीक यांनी नुकत्याच झालेल्या गडचिरोली दौऱ्यात यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित करत निधी मंजुरीची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश […]
समाजकल्याण योजनांच्या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली दि.१२: – सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजकल्याण योजनांच्या मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला बसस्थानक, पंचायत समिती, तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली. शासनाच्या कल्याणकारी योजनांबद्दल नागरिकांमध्ये […]
शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. ११ : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (SWaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]