कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणावरील मसुद्याबाबत सल्लामसलत करून राज्यातील कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी शासन आग्रही असल्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले. मंत्रालय येथे कृषी विभागाने कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणावरील मसुद्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी […]
विदर्भ
विविध योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 16 : सन 2006 ते 2013 दरम्यान विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी सरळ खरेदीने भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदला मिळाला असल्याने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला होता. हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाने या कालावधीतील सरळ खरेदीने संपादित केलेल्या क्षेत्राकरिता पाच लक्ष प्रति हेक्टर दराने 16 हजार 633 हेक्टर क्षेत्राकरिता 831 कोटी 67 लक्ष रुपये सानुग्रह […]
उद्योग उभारणीसाठी विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. यामुळे अमरावतीसह विदर्भामध्ये विमानतळ निर्मिती व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. अमरावती येथील विमानतळाची धावपट्टी यापुढील काळात 3000 मीटर इतकी करण्यात येईल. स्टेट ऑफ आर्ट असलेल्या अमरावती विमानतळ आणि पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार आहे. येत्या […]
प्रलंबित घरकुलांसह पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
प्रधान मंत्री जनजातीय महा न्याय अभियानाचा आढावा गडचिरोली, दि. १३ एप्रिल – प्रधानमंत्री जनजातीय महा न्याय अभियान (पीएम जनमन) अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हास्तरीय आढावा घेतला. दूरदृष्टी प्रणालीद्वारे पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 8321 […]
जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे
भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधाण्याने करण्याची गरज मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर डोंगरे यांनी व्यक्त केली. जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित “जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025” उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज गडचिरोली पाटबंधारे विभागात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समीर डोंगरे यांच्या हस्ते संपन्न […]
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पासाठी 4819 कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा माध्यम प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद गडचिरोली दि.११: गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या गोंदिया ते बल्लारशा या २४० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल ४ हजार ८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला […]
हिवताप प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबवा
अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचना जिल्ह्यात हिवताप आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या हिवताप प्रतिबंध अंमलबजावणी समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी […]
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावांचे खोलीकरण होणार
मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पुनस्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेतीची उत्पादन क्षमता वाढून एकंदरित कृषी उत्पनात वाढ होणार आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या […]
वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत निविदा आमंत्रित
गडचिरोली, (जिमाका) दि.09:जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व इतर कार्यालयीन कामाकरीता (होंडा अमेझ) या दर्जाची वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत इच्छुक वाहन पुरवठा धारकांना आवाहन करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन पुरवठा धारकांनी निविदेकरीता व अधिक माहिती करीता 11 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, डॉ.बाबासाहेब […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सप्ताहाचा प्रारंभ
गडचिरोली अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व वंचित दुर्बल व्यक्तींच्या सर्वागीण घटकातील करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांनी माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उददेशाने दरवर्षी 8 एप्रिल 14 एप्रिल कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज […]