केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अंथरुणाला खिळून असलेल्या किंवा रुग्णालयात भरती असलेल्या पेन्शन धारकांचं लाईफ सर्टिफिकेट आता बँक कर्मचारी स्वतः जाऊन कलेक्ट करणार आहेत. यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्राच्या पेन्शन आणि पेन्शन धारक कल्याण विभागाने याबाबतचा आदेश दिला आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सुपर-सीनियर पेन्शनर्सना डिजिटल माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट बनवण्यास मदत करावी, तसंच याबाबत जागरुकता निर्माण करावी असंही बँकांना सांगण्यात आलं आहे.
DOPPW विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता पेन्शन धारक घरबसल्या देखील डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहे. यासाठी फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल. यामुळे स्मार्टफोनच्या मदतीने देखील डिजिटल हयातीचा दाखला भरता येऊ शकेल.