ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – रब्बी हंगामात खत, यूरियाच्या खरेदीवर मिळणार सब्सिडी

केंद्र सरकारने रब्बी हंगामात खत खरेदीवरील सब्सिडीला मान्यता दिली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईए बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. 

 ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किंमती वाढल्या तरी भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

किती मिळणार सब्सिडी

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनबीएस पॉलिसी अंतर्गत निश्चित केलेली किंमत रब्बी सीझनसाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत राहील. 

 त्यानुसार आगामी रब्बी हंगामात नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 47.2 रुपये, फॉस्फोरस 20.82 रुपये, पोटॅशसाठी 2.38 रुपये, सल्फर 1.89 रुपये प्रतिकिलो सब्सिडी देण्यात आली आहे.

 तसेच केंद्र सरकार पूर्वीप्रमाणेच 1350 रुपये प्रति बॅग दराने डीएपी शेतकऱ्यांना देत राहील, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.