केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
हाय सिक्युरिटी नंबर रजिस्ट्रेशन हे कोणाला करावं लागणार आहे ?
आपण २०१९ पुरवी वाहन खरेदी केलं असेल तर आपणाला १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवून घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटचा काय फायदा होणार ?
- चोरी रोखणे, बनवट नंबर प्लेट मुले होणाऱ्या वाहन चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होते
- पोलिसांना व प्रशासनाला वहाने ट्रॅक करणे सोपे होते
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट घेतलं नसेल तर काय होणार ?
हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
नंबर प्लेट रजिस्टर करण्याची शेवटची तारीख ?
18 फेब्रुवारी 2026
रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- गाडी नंबर
- आधारकार्ड
- चेसिस नंबर व इंजिन नंबर
- मोबाईल नंबर





