खेळातुन मिळवीलेली स्फुर्ती विधायक कार्यांवर खर्च व्हावी- राजे अम्ब्रीशराव आत्राम
एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम अशा कोकोबंडा गावात क्रिडा सम्मेलनाच्या ऊघ्दाटण सोहळ्याच्या प्रसंगी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी आपल्या ऊघ्दाटनीय भाषणात युवकांना मार्गदर्शन केले.कबड्डी मैदानाचे रितसर ऊघ्दाटन करण्यात आले. त्यानंतर औपचारीक भाषणे झाली.ऊघ्दाटन प्रसंगी बोलतांना खेळांच्या दरम्यान तयार होणारा ऊत्साह,हुरूप तसेच एकीची भावना परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापरावी असे आवाहन केले.स्पर्धा आयोजन केल्याबद्दल तेथील युवकांची राजेसाहेबांनी प्रशंसा केली.तसेच परिसराच्या विकासासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास सदैव माझे भक्कम पाठबळ असणार अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी राजे साहेबांचे कोकोबंडा येथे पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले. कोकोबंडा सारख्या अतीदुर्गम भागातील युवकांची कबड्डी टूर्नामेंट घेण्याची इच्छा दर्शविताच राजेंनी लगेच मदतीचे आश्वासन दिले होते.त्यांचे निमंत्रण स्विकारले होते.त्या अतिदुर्गम परिसरात भेट देणारे पहीलेच नेते ठरले असल्याचे स्थानिकांनी सांगीतले.कोकोबंडा सह कोटमी व इतर दुर्गम गावांना राजे साहेबांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील समस्या जाणुन घेतल्या व सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवीली.
याप्रसंगी वनिता हिचामी सरपंच ग्रा.पं. कोहका, प्रशांतभाऊ आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, मोहन नामेवार, रविभाऊ नेलकुद्री अहेरी, भाजपा तालुका अध्यक्ष, संतोष मद्दीवार भाजपा महामंत्री अहेरी, गुड्डू ठाकरे, विनोद जिल्लेवार, संजय पोहणेकर,लक्ष्मी कुमरे,अन्नपूर्णा मोहुले देवनाथ सोनुले, गोटा सर, राजू नरोटे, देहू गावडे ,मांगूराम उसेंडी, नानाजी कुडयामी, अशोक मडावी, जनली नरोटे, संकु पुंगाठी, लता पुंगाठी, मुकेश कावळे, शत्रू नरोटे, इसरू पोटावी, सुधाकर नरोटे, अनिल गावडे, राकेश नरोटे, रामदास गोटा,व गावातील नागरिक उपस्थित होते