ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न

मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर ला कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून बसवराज मसतोडी जिल्हा कृषी अधिकारी,कुमरे साहेब जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे होते.प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी एल.बी.जुआरे , विकास पाटील तालुका कृषी अधिकारी,नेताजी मेश्राम गट शिक्षणााधिकारी मुलचेरा, अमारी रॉय प्रभारी एकत्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मुलचेरा, आकुल मंडल सरपंच कालीनगर, जया मंडल सरपंच सुंदरनगर,आदी मान्यवर उपस्थित होते.सदर शिबिरात विविध विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ महिलांना देण्यात आला. शिबिरात शालेय विदयार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित नागरिक व महिलांचे मनोरंजन केले. शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती,पशुसंवर्धन विभाग,शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग,भूमी अभिलेख विभाग, सेतू विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र विज वितरण कंपनी इत्यादी विभागांचा वतीने स्टाल लावून त्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची जनजागृती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम शिबिरस्थळी करण्यात आले.त्याचप्रमाणे उमेद च्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूची विक्री व प्रदर्शनी आणी प्राथमिक आरोग्य केंद्र अडपल्ली माल यांचे वतीने रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.महिला सशक्तीकरण शिबिरामध्ये विविध विभागांच्या योजनेंचा लाभ मिळाल्याचा समाधान उपस्थित प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर दिसून आला.सदर शिबिराच्या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गोमनी चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले तर प्रास्ताविक युवराज भांडेकर मंडळ अधिकारी मूलचेरा यांनी केले.शिबिराला परिसरातील हजारोच्या संख्येतील महिलांची गर्दी लक्ष वेधून घेणारी होती.शिबिराच्या यशस्वीततेसाठी प्रशांत मेश्राम तलाठी अडपल्ली माल, पिना घुगलोत ग्रामसेवक कालीनगर, मृण्मय मंडल, प्रितम आदे, बिस्वास सर मुख्याध्यापक ,चौधरी सर मुख्याध्यापक, माझी सर मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक वृंद, सर्व विभागाचे कर्मचारी मोरेश्वर वे व समस्त कालीनगर वासियांनी सहकार्य केले.