मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर ला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तमराव तोडसाम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून मुलचेऱ्याच्या पहिल्या महिला पंचायत समिती माजी सभापती सुवर्णा येमुलवार ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी एल.बी.जुआरे , गौरकार सहाय्यक प्रकल्प अधिकारी, विकास पाटील तालुका कृषी अधिकारी,नेताजी मेश्राम गट शिक्षणााधिकारी मुलचेरा, अनारी रॉय प्रभारी एकत्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मुलचेरा, उमेश कळते सरपंच आंबटपल्ली, जया मंडल सरपंचा सुंदरनगर,आदी मान्यवर उपस्थित होते.सदर शिबिरात सर्व विभागांची महिला लाभ वितरणाची संख्या 11350 होती. शिबिरात शालेय विदयार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित नागरिक व महिलांचे मनोरंजन केले. शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती,पशुसंवर्धन विभाग,शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग,भूमी अभिलेख विभाग, सेतू विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र विज वितरण कंपनी इत्यादी विभागांचा वतीने स्टाल लावून त्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची जनजागृती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम शिबिरस्थळी करण्यात आले.त्याचप्रमाणे उमेद च्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूची विक्री व प्रदर्शनी आणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर यांचे वतीने रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.महिला सशक्तीकरण शिबिरामध्ये विविध विभागांच्या योजनेंचा लाभ मिळाल्याचा समाधान उपस्थित प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर दिसून आला.सदर शिबिराच्या कार्यक्रमाचे संचालन गोमनी चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले तर प्रास्ताविक व आभार महेश मुक्कावार केंद्रप्रमुख सुंदरनगर यांनी मानले.शिबिराला परिसरातील हजारोच्या संख्येतील महिलांची गर्दी लक्ष वेधून घेणारी होती.शिबिराच्या यशस्वीततेसाठी मोरेश्वर वेलादी सचिव ग्रामपंचायत आंबटपल्ली, काजल मेश्राम, रमाबाई मडावी, रमेश आलाम, सूर्यभान मडावी व समस्त आंबटपल्ली वासियांनी सहकार्य केले.
Related Articles
योगसाधना ही लोक चळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कार्यक्रम मुंबई दि २१: “बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती […]
गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा !
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर […]
विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पर्यटन विभाग व इंडियन ऑइलतर्फे प्रकाश व ध्वनी कार्यक्रम संपन्न मुंबई, दि. ८ : सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. […]