ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते तालुका क्रीडा संकुलचे उदघाटन

मुलचेरा:-तालुक्यातील विवेकानंदपूर येथे भव्य क्रीडा संकुल चे बांधकाम करण्यात आले.नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर,तहसीलदार कपिल हाटकर,जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंधल,तालुका क्रीडा अधिकारी भास्कर गठाळे,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,गटविकास अधिकारी एल बी जुवारे,गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम,मंडळ अधिकारी वाय पी भांडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्य कारी अध्यक्ष तथा कोठारीचे उपसरपंच मनोज बंडावार, विवेकानंदपूर चे सरपंच भावना मिस्त्री,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ममता बिश्वास,शहर अध्यक्ष मनोज कर्मकार,विष्णू रॉय, अब्दुल लतीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुका मुख्यालयात सुसज्ज तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम व्हावे ही येथील नागरिकांची मागणी होती. आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी निधी खेचून आणून तालुका वासीयांसाठी सुसज्ज क्रीडा संकुल उभे केले.नुकतेच क्रीडा संकुलचे आणि चारही दिशांनी संवरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले.आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते उदघाटन करून तालुका वासीयांसाठी क्रीडा संकुल खुले करण्यात आले.