ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह २५ नोव्हेंबरपर्यंत

मुंबई, दि. 22 : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली या संस्थेतर्फे 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कौमी एकता सप्ताहामध्ये ‘सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागातर्फे परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

यानुसार, 25 नोव्हेंबर 2022 रोजी ध्वजदिन साजरा करण्यात येणार आहे. ध्वजदिनाचा निधी संकलित करून राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्याकडे सुपूर्द करवायचा आहे. ध्वजदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था आणि देणगीदार यांच्याकडून स्वेच्छेने निधी संकलित करावा. कर्मचाऱ्यांकडून हा निधी स्वेच्छेने डब्यांतून संकलित करावा. खाजगी संस्था वा देणगीदार अथवा करदाते यांचा निधी धनादेशाद्वारे स्वीकारण्यात येणार आहे. हा धनादेश सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली या नावाने घेण्यात यावा.

निधी संकलित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी व मंत्रालयीन विभागांनी माजी सैनिक कल्याण मंडळे, रेड क्रॉस सोसायटी अथवा तत्सम संघटना यांच्याकडून डबे उपलब्ध करुन निधी संकलित करावा. डब्यात संकलित केलेला निधी हा कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यासमोर मोजून त्याचा डिमांड ड्राफ्ट तयार करून धनादेश सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, सी विंग, 9 वा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली- 110003 यांच्याकडे नोंदणी टपालाद्वारे परस्पर पाठवावा किंवा संकलित केलेला निधी खालील बँक खात्यावर परस्पर हस्तांतर करावा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खान मार्केट, न्यू दिल्ली-110003, खाते क्र-1065439058, आयएफएससी कोड-सीबीआयएन ०२८०३१०,  बँक- स्टेट बँक ऑफ इंडिया, निर्माण भवन, मौलाना आझाद रोड, न्यू दिल्ली-110011, खाते क्र. 10569548047, आयएफएससी कोड-एसबीआयएन ००००५८३ आणि बँक ऑफ इंडिया, खान मार्केट, न्यू दिल्ली-110003, खाते क्र-600710110006040, आयएफएससी कोड- बीकेआयडी ०००६००७. या बँकांमध्ये “नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मोनी” या खात्यावर हा निधी जमा करायचा आहे.

सर्व जिल्हाधिकारी, मंत्रालयीन विभागांचे सचिव यांनी जास्तीत जास्त निधी संकलित करावा, असेही आवाहन अल्पसंख्याक विभागाकडून करण्यात आले आहे.