ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राजभवनात ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ रेखाचित्र कार्यशाळेचा समारोप

मुंबई, दि. ६ : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाला.

राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पाहिली व  त्यांना कौतुकाची थाप दिली.

विद्यार्थ्यांनी काढलेली छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील, असे राज्यपालांनी सांगितले व विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले.

यावेळी जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, कार्यशाळेचे समन्वयक व अधिव्याख्याता प्रकाश सोनावणे तसेच सहयोगी अधिव्याख्याता शार्दूल कदम उपस्थित होते.

या कार्यशाळेत जे. जे. च्या ४८ पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तसेच २ अधिव्याख्यात्यांनी राजभवनातील विविध वास्तू तसेच शिवकालिन गडकिल्ल्यांची ५० रेखाचित्रे काढली.

000

Two day workshop on ‘Glory of Heritage’ concludes at Raj Bhavan

 

Paintings by students to adorn walls of Raj Bhavan buildings

Mumbai, 6th Feb: The 2- day painting workshop organised by Raj Bhavan for the students of Sir J J School of Art concluded at Raj Bhavan on Sunday.

Governor Bhagat Singh Koshyari at whose instance the workshop was organised, visited the display of paintings and patted the students and lecturers for bringing Raj Bhavan heritage on the canvass.

Stating that the paintings of Raj Bhavan heritage buildings and those of the forts of Maharashtra drawn by the students will adorn the walls of various Raj Bhavan buildings, the Governor announced a token reward for all the participants.

Dean of the Sir JJ School of Art Dr Vishwanath Sable, coordinating lecturer Prakash Sonawane, lecturer and artist Shardul Kadam and undergraduate and postgraduate students of the Sir J J School were present.