नागपूर :-महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंध संस्थान नागपूर येथे तिन दिवसीय निवासी नर्सरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातुन प्रशिक्षणार्थी आले होते.सदर प्रशिक्षणामध्ये फळ रोपे, भाजीपाला रोपे तयार करणे, फळे भाजीपाला अभिवृद्धी, फळबाग आखणी आणि उभारणी, बागेचा आराखडा, नर्सरी उद्योगांची उभारणी आणि व व्यवस्थापन, पिकांचे पीक संरक्षण निगा आणि काळजी, नर्सरीसाठी परवाना प्रक्रिया, नर्सरीमधील सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रक्षेत्र भेटी आदी विषयांचा समावेश होता. प्रशिक्षण विनामूल्य होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले आहे, या कार्यशाळेत प्रमुख उपस्थितीत हेमंत जगताप, दिगंबर साबळे , रुपकुमार पगारवार,दिपक बेदरकर, प्रभाकर शिवणकर, डॉ अश्विनी गायधनी,कोनन इंद्रपाल सिंग, डॉ सिमा ठाकरे , कांतिलाल पवार,सरोज देशमुख, पुजा वासोदे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ कैलास मोते, मिलींद आकरे, डॉ आशिष जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत जगताप यांनी केले तर आभार हबिब शेख यांनी मानले
Related Articles
व्येंकटरावपेठा येथे ११८ जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले
आदिवासी विद्यार्थी संघा व अजयभाऊ कंकडालवार मित्र परिवाराकडून आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ११८जोडपे विवाहबद्ध सामूहिक विवाह सोहळ्याला हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येते आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळ कडून काल व्येंकटरावपेठा येते लक्ष्मी देवी बोनलू व ११८ जोडप्याच्या एकाच मांडवात सामूहिक लग्न सोहळा पार पडला असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे […]
व्हाईस ऑफ मीडियातर्फे आज धरणे आंदोलन
गडचिरोली: व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या प्रश्नांवर २८ ऑगस्टला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विविध ९ मागण्यांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. दहा वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्यांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, राज्याच्या माहिती महासंचालनालयाने चे पोर्टल तयार करून पदवी पूर्ण केलेल्या व पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले […]
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजभवनात शपथविधी संपन्न; राज्यपाल रमेश बैस यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. […]