ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

खासदार अशोकजी नेते यांची मुलचेरा तालुक्यातील भवानीपुर येथे सांत्वना भेट

मुलचेरा: तालुक्यातील भवानीपुर येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते अशोक मुजुमदार वय ५४ वर्ष हे दिं.१९ ऑक्टोंबर २०२३ ला सकाळी ९ .०० वाजता च्या दरम्यान आपल्या शेतावर काम करित असतांना अचानकपणे जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने करंट लागून जागीच मृत्यू पावला.

या घटने संबंधितची माहिती मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांनी दिली असता खासदार अशोकजी नेते यांनी आज दि.२९ ऑक्टोंबर २०२३ रविवार ला लगेचच मुलचेरा तालुक्यातील भवानीपुर येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण करून मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले.

याप्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,माजी जि.प. अध्यक्ष तथा भाजपाचे सोमया पसूला,मुलचेरा तालुकाध्यक्ष संजिव सरकार,तालुका महामंत्री विजय बिशवास,जिल्हा सचिव बादल शहा,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष गणपती,भाजपा जेष्ठ नेते विधान वैद्य,युवा नेते अशोक बढा़ल,गोकुळ सिद्दार, विवेक हलदार, दिनेश बहादुर तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.