ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ विशेष माहिती

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MahaCovid19Relief

विशेष माहिती :-

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत.
  • मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची २ प्रत.
  • जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक.
  • अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत.
  • मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • आरटी-पीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज (पीडीएफ/जेपीजी)(मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसताना).

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज:

शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील लिंकवर लॉगिन करून नोंदणी करणे आवश्यक राहील.

https://mahacovid19relief.in/login

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.

केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील.

अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.

MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) tweeted at 9:04 pm on Wed, Dec 01, 2021:
#कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या https://t.co/8VIEZ6iyRv या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा.