ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे-:तहसीलदार चेतन पाटील

मुलचेरा-: कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे असून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी समोर येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक विकास साधन्याचे आवाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सन 2023-24 अंतर्गत अतिदुर्गम,आदिवासी बहुल देवदा येथे आयोजित भव्य मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून केले.पुढे मार्गदर्शन करतानी त्यांनी म्हटले की,देशाचा विकास करायचा असेल तर महिलांनी पुढे आले पाहिजे. शासन विविध योजना राबवित असतो.परंतु,सदर योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे महत्वाचे असून त्याचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

 शिबिराचे उदघाटन डॉ. विलास गाडगे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त गडचिरोली यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी एल. बी.जुआरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मट्टामी, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,एकत्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अमरी रॉय, देवदाचे सरपंच केशरी पाटील तेलामी, बोलेपल्लीचे सरपंच गणेश हिचामी, वेंगनूर चे उपसरपंच नरेश कांदो, बोलेपल्लीच्या उपसरपंचा वैशाली दुर्गे, देवदाचे उपसरपंच संतोष तुमरेटी यांची उपस्थिती होती. सदर शिबिरामध्ये परिसरातील 1480 महिलांची उपस्थिती होती. महिलांना विविध विभागामार्फत देण्यात आलेल्या एकूण लाभांची संख्या 10120 होती. कार्यक्रमामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले वितरीत करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय मुलचेरा व प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर च्या वतीने शिबिरामध्ये 690/महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उमेद च्या वतीने बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूची विक्री व प्रदर्शनी शिबिरामध्ये करण्यात आली. महसूल विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती विभाग, पशुसंवर्धन विभाग, बँक विभाग, उज्वला गॅस योजना, महीला व बालकल्याण विभाग, उमेद विभाग, तालुका कृषी विभाग, वन विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, महावितरण विभाग,सेतु केन्द्र, आभा कार्ड, आयुष्मान भारत, आधार केंद्र नविन नोंदणी व दुरुस्ती, ई श्रम कार्ड आदी विभागानी स्टॉल लावून विविध योजनाची माहिती दिली.यावेळी बोलेपल्ली येथील दोन प्रगतशील महिला शेतकऱ्याना कृषी यंत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी युवराज भांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लगाम चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी बोलेपल्ली च्या तलाठी रसूला उसेंडी, अर्जुन कांदो, विनोद गोटा, पालीबाई मटामी यांनी सहकार्य केले.