आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार
राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव उपक्रम
अहेरी:-8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून भाग्यश्री शिशु योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
स्तनदा मातांसाठी आणि नवजात बाळासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत असलेतरी अगदी प्रसूतीनंतर वेळेवर स्तनदा माता व नवजात बाळाला वेळेवर पोषक आहार मिळावं आणि माता आणि नवजात बाळाची प्रकृती निरोगी राहावे तसेच त्यांची कुठलेही गैरसोय होऊ नये या उदात्त हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “भाग्यश्री शिशु योजना” अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात “भाग्यश्री शिशु योजने”चा शुभारंभ माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी भाग्यश्रीताई ताईंच्या हस्ते जवळपास 30 ते 35 नुकतेच प्रसुती झालेल्या स्तनदा माता आणि नवजात बाळाला कपडे, डायपर,पौष्टीक आहार आणि खेळणी असलेले किट चे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सौ.आरती डुकरे,संध्या मुंगमोडे,मंगला गोबाडे,माया सुनतकर,शोभा मडावी,सुवर्णा सडमेक,निवेदिता विरगोनवार आदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*दर बुधवार ला होणार किट वाटप*
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उत्तम सोयीसुविधा असल्याने विविध तालुक्यातील गरोदर मातांना प्रसूतीसाठी आणले जातात. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या “भाग्यश्री शिशु योजने”च्या माध्यमातून दर बुधवार ला सदर किट वाटप करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ आणि रुग्णांच्या मदतीसाठी संपर्क करा
सदर योजनेचे बॅनर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात लावले असून त्यात दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून योजनेचा लाभ घ्यावे तसेच खेड्यापाड्यातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी 24×7 राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयार असून थेट संपर्क करण्याचे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले आहे.