सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) याबाबत नवीन धोरण तयार करून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.
सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) अधिनियम १९५४ नुसार मौजा, गांधी चौक, ता.वणी, जि.यवतमाळ येथील निर्वासित सिंधी समाजाच्या विस्थापितांना दिलेले वाणिज्य भुखंडाचे पट्टे नियमित करुन मालकी हक्क प्रदान करणे आणि जरीपटका कॉलनी, नागपूर येथील अतिक्रमीत जागेसंदर्भात महसूल मंत्री यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर व संबधित अधिकारी उपस्थित होते.
