मूलचेरा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा
भारतीय जनता पक्ष मूलचेरा तालुका समितीची मागणी
मूलचेरा तालुक्यातील जवळपास 90% टक्के जनता ही शेतकरी आहे आणि मूलचेरा तालुक्यात 69 गावे समाविष्ट आहेत, येथील शेतकरी शेतीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत असतो.
माहे जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणी खालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती बिकट या सर्व घटकांचा परिणाम झाल्याने मूलचेरा तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे, महाराष्ट्र शासनाने काही दिवसा अगोदर 15 जिल्ह्यातील 40(चाळीस) तालुक्याची दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषणा केली आहे.
त्यामध्ये मूलचेरा तालुका समाविष्ट करून, मूलचेरा तालुका हा सुद्धा दुष्काळ ग्रस्त घोषित करून येथील शेतकऱ्यांना न्याय द्या,अशी मागणी भाजपा मूलचेरा तालुका समितीने महाराष्ट्र शासनाकडे निवेदनातुन केली आहे.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजीव सरकार,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, बंगाली आघाडी जिल्हा सरचिटणीस बिधान बैद्य,तालुका महामंत्री सुभाष गणपती,उपसरपंच तपन मल्लिक,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, बंगाली आघाडी तालुका अध्यक्ष मोंटूजी सरकार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक,बंगाली आघाडी तालुका सचिव प्रदीप रॉय,स्वरूप पोद्दार,तापश सरकार, गौरंग कर्मकार,सुकुमार कायल,गुरूंचरन ताती,प्रणव रॉय, बाजीराव मडावी, देवाजी मंनो इत्यादी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.