हालाकीच्या परिस्थितीवर मात करून माहापलिका आयुक्त विपीन मुग्धा यांचा प्रेरणादायी प्रवास
बल्लारपूर 14 ऑक्टोबर : घरची हालाकीची परिस्थिती शिक्षणाला अडसर ठरत होती. मात्र मनात प्रचंड इच्छाशक्ती होती. शिक्षणात अतिशय हुशार असलेले विपीन मुग्धा यांचे १२ वीच्या परीक्षेच्या सहा गुणांनी गुणवत्ता यादीत स्थान हुकले. इच्छा सिएचे शिक्षण घ्यायची होती. पण कुटुंबाची परिस्थिती शिक्षणाला अडसर ठरत होती. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून किराणा दुकानात काम करून डीएडचं शिक्षण पूर्ण केलं. जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. नोकरीमुळे पडल्या कुटुंबाला हातभार लागला चिंता दूर झाली जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिक्षण देणे सुरू होते मात्र मनात काही वेगळेच सुख होत प्रशासकीय सेवेत काम करायची मनात ओढ निर्माण झाली. त्यामुळे पुढे शिक्षकी नोकरीत ते फार काळ रमले नाही. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्या प्रयत्नात ते ना तहसीलदार झाले पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन पद भूषवले. पुढे मुख्याधिकारी म्हणून बल्लारपूर, पोंभूर्णा, वर्धा येथे उल्लेखनीय कार्य केले व शहर सुंदर शहर साझा कार्ड माझी जबाबदारी स्वच्छता दिडी हागणदारी मुक्त शहर कचरा मुक्त शहर अश्या लोकसहभागातून लोकहिताच्या यशस्वी योजना राबविल्या जनसामान्यात उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून विपीन मुग्धा यांनी आपली ओळख निर्माण केली.
त्यांच्यात काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे आपल्या कामाची छाप सोडली. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून पुढे त्यांना चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोन करीत असतानाच, नुकतीच त्यांना चंद्रपूर महानगर पालिकेची आयुक्त म्हणून नवी जवाबदारी मिळाली आहे.
विपीन मुग्धा यांचा हा प्रवास स्वप्रवल असला तरी त्यांच्या मागे कुटुंबीय प्रोत्साहन त्यांची स्वतःची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम कारणीभूत असल्याचे भावना कुटुंब आणि जवळच्या मित्रांकडून सांगितले जाते. त्यांच्या शाला प्रगतीचे पंख असेच जडत जाऊन अजून उंच भरारी घ्यावी. अश्या शुभेच्छा आप्त स्वकीय आणि मित्रपरिवाराच्या वतीने दिल्या जात आहेत.