सातारा, दि. २५ : देशाचे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषि, औद्योगिक व पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलला भेट देऊन सातारा जिल्ह्यातील गाय वर्गातील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत माहिती घेऊन चर्चा केली.
