मुलचेरा:-तालुक्यात विवेकानंदपुर येथील संजु गुरू दास हा वक्ती अपंगपणाने ग्रासलेला होता. तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी शिबिर आयोजन केले होते.
या शिबिरात संजु गुरू दास यांना आँनलाईन फार्म भरुन कागदपत्रे आणण्यास डॉ मल्लिक यांनी मार्गदर्शन केले. त्या नंतर आरोग्य विभातील कर्मचारी यांनी संजू ला भेट घेऊन कागत पत्र जमा करण्या विषयी सांगितले.
या शिबिरात संजु गुरू दास यांना चांगला प्रतिसाद मिळाला उत्तमरित्या तपासणी करण्यात आली.आरोग्य विभागाच्या वतीने निर्णय घेऊन अपंग प्रकारात locomotor प्रकार अढळून आले यात 50% अपंग असलेले UDID Card प्रशासनच्या वतीने कार्ड मंजुर झाले.
तालुका वैधकीय अधिक्षक डॉ ललित मल्लिक यांच्या हस्ते संजू गुरू दास यांना UDID Card वाटप करण्यात आले.
कार्ड भेटल्यानंतर संजू गुरू दास यांच्या डोळ्यात अश्रु आले मनःपूर्वक आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले कारण अपंग असल्याने खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आज कार्ड मिळाल्याने बरेस समस्या सुटतील अशी त्यांना आशा निर्माण झाली.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याने मिळणारे लाभ तालुका वैधकीय अधिक्षक डॉ ललित मल्लिक यांनी संजू गुरू दास यांना खालील प्रमाणे सांगितले
दिव्यांग व्यक्तींकरिता विविध वैयक्तिक तसेच सामुहिक लाभाच्या योजनाचा लाभ मिळणे.
दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरण करून पुनर्वसन करणे.
दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारचे साहित्य साधने आणि उपकरणे पुरवठा करणे.
दिव्यांग व्यक्तींना अनेक रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
दिव्यांग व्यक्तींकरीता विवाह प्रोत्साहनपर योजना राबविणे,
दिव्यांगाचे २१ प्रकार निहाय योजना आणि माहिती उपलब्ध करणे.
मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद करून त्यांना मतदानाचा समान हक्क देणे.
दिव्यांग विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि परिक्षेतील सवलती मिळवून देणे.
दिव्यांग व्यक्ति, विद्यार्थी आणि खेळाडू यानां अर्थ सहाय्य करणे.
दिव्यांग व्यक्ती, बालक आणि त्यांच्या पालकांना विविध करांमध्ये सवलती देणे.
राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती संकलन करणे.
केंद्र / राज्य / स्थानिक स्वराज्य संस्था/ महामंडळे इ. विविध विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरितांच्या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना देणे.
हेमोफिलिया (Hemophilla), थैलेसिमिया (Thalassemia), सिकल सेल (Sickle Cell Disease) या रक्त संबंधित आजाराच्या रुग्णांना औषधे आणि रक्ताचा पुरवठा करणे.
जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत यांच्या स्वउत्त्पनाच्या ५% टक्के निधीतून विविध कल्याणकारी योजना आखणे.