ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर

दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यसस्वी आयोजन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण ९००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यानुसार आज ३ मार्च रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र, चामोर्शी येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिग, रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, गट विकास अधिकार सागर पाटील, वैद्यकीय अधिकारी श्रीमती मदने मडम, तहसीलदार संजय नागटिळक, अतिरिक्त गट विकास अधिकार भीमराव वनखंडे, तालुका आरोग्य अधिकारी प्रफुल हुलके, विस्तार अधिकारी (ग्रा.प.) मदनकुमार काळबांधे, विस्तार अधिकारी (सांखिकी ) पेंदोर, चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख हिमंतराव आभारे, गट साधन केंद्राचे विषय तज्ञ चांगदेव सोरते आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.

प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची, जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या, सोबतच जिल्हाधिकारी संजय मीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा शिबीराच्या नियोजन व व्यवस्थापनेचे कौतुक केले.
सदर शिबिराच्या दुस-या दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६६१ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. दोन दिवसात एकूण १०६१ पैकी प्राथमिक तपासणी व निदान झालेल्या अंदाजे ८३७ पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) आणि शासनाच्या विविध योजनांचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले. लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्याँना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य-उपकरणे देण्यात येईल. मागील ११ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५१२७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते, डॉ. तारकेश्वर ऊईके, डॉ. प्रिया मेश्राम, डॉ. रोहन कुंभरे, सुमित पौल, डॉ. स्मिता सालवे, डॉ. सचिन हेमके, डॉ. तारा वालके, डॉ. दिक्षा सोनारखान, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, संदीप मोटघरे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, ग्रामीण रुग्णालय, चमोर्शी, तालुका आरोग्य विभाग, चामोर्शी, पंचायत समिती, चामोर्शी अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, आशा, आशा गट प्रवर्तक तथा बोमन्वार विद्यालय येथील विद्यार्थी, समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.