उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रश्न निकाली.
अहेरी अधिवक्ता महासंघाच्या लढ्याला अखेर यश..!
अहेरी येते २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तथा न्यायमूर्ती मा. भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य शुभारंभ..
गडचिरोली जिल्हा न्यायालयात जाणे हे अहेरी, भामरागड , एटापल्ली, मुलचेरा तसेच सिरोंचा तालुक्यातील अंकीसा, आसरअली या दुर्गम भागातील जनतेला अक्षरशः दिव्यातुन पार पडल्यासारखे असायचे. गडचिरोली ऐवजी अहेरीला जिल्हा व सत्र न्यायालय असणे सर्वांच्या सोयीचे होते. कित्येक वर्षांपासुन त्यासंदर्भात मागणी होती. तब्बल एक तपापासुन अहेरी तालुका अधिवक्ता महासंघाचा यासाठी संघर्ष सुरु होता.फाईल मंत्रालयात रखडलेली होती. मा.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतांना तत्कालीन पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी अधिवक्ता महासंघाच्या सदस्यांना मुंबईला पाचारण करुन प्रक्रीयेला वेग आणला व मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रकरणाची गांभीर्य ओळखुन तात्काळ मंजुरी ही दिली होती परंतु नंतर महाविकास आघाडी सरकार आल्याने सदर काम रखडले होते, परंतु पुन्हा सरकार बदलले व मागील अधिवेशनात राजे साहेबांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तत्परतेमुळे ऊर्वरीत सोपस्कार पार पडले होते. अहेरी येथे जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी देण्यात आली, आज ते स्वप्न पुर्णत्वास येतांना सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे.
येत्या २२ तारखेला सदर न्यायालयाचे उद्घाटन संपन्न होणार असुन ऊद्घाटक म्हणुन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. श्री.भुषण रा.गवई राहणार व मा. ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तथा ऊच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा.श्री.अतुल श. चांदुरकर आणि मा. श्री.महेंद्र वा. चांदवाणी तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.श्री.ऊदय बा.शुक्ल यांच्या प्रमुख ऊपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे,गेल्या अनेक वर्षांची जनेतची मागणी पूर्ण झाल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे..!!