मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर 5 कोटी 92 लाख 16 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यासाठी 76.32 टक्के ग्रामीण(469.71लक्ष) व 45.34 टक्के शहरी ( 230.45लक्ष) असे एकूण 7 कोटी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर सध्या राज्यात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांची संख्या नाशिक, जळगाव, नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यात सर्वाधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 78 हजार 563, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 29 लाख 80 हजार 804,जळगांव जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 35 हजार 192 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 22 लाख 19 हजार 690 ,नंदूरबार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 06 हजार 857 प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यी संख्या 7 लाख 41 हजार 360,अमरावती जिल्ह्यातील अत्योंदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 25 हजार 632, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 14 लाख 8 हजार 878 ,यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 32 हजार 603 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 14 लाख 69 हजार 136 ,चंद्रपूर जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 40 हजार 621 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 10 लाख 74 हजार 240,गडचिरोली जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक 1 लाख 02 हजार 338 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 4 लाख 57 हजार 869 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. राज्यात एकूण 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 5 कोटी 92 लाख 16 हजार यांना सवलतीच्या दरात योग्य व गरजू व्यक्तींना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वर (Digitisation) संगणकीकरण करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सुधारित इष्टांक देताना जिल्हा , शहर अथवा गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार पात्र असलेल्या शिधापत्रिकेवरील ज्येष्ठ महिलेच्या नावावर कुटुंबप्रमुख असा शिक्का मारण्याची खबरदारी यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांक वाढीबाबतचा शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.