महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.
ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप मधून पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत दुरुस्त किंवा रद्द करा ! (E Peek Pahani Version-2 App):
शेतकरी बंधूंनो ई – पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन- २ मध्ये शेतकऱ्यांनी नोंदविलेली पीक पाहणी नोंदविल्या पासून 48 तासांच्या आत केव्हाही त्यांना एकदाच दुरुस्त किंवा रद्द करता येणार आहे. या नवीन सुविधेचा उपयोग करून शेतकऱ्यांकडून पीक पाहणी करताना चूक झाली असल्यास त्याची दुरुस्ती स्वतःच्या पातळीवर दुरुस्त करू शकता. ई-पीक पाहणी व्हर्जन-२ ॲप डाउनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App
ई-पीक पाहणी व्हर्जन-२ ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून खालील स्टेप्स नुसार पीक पाहणी दुरुस्त किंवा रद्द करा.
शेतकरी बंधूंनो पीक पाहणी नंतर आता आपण ४८ तासात दुरुस्तीची प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊया आपण पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर मोबाईल स्क्रीन च्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या पिकांची माहिती पाहा या बटन वर क्लिक करा आपण केलेल्या पीक पाहणीचा घोषवारा आपल्याला दिसेल.
आपणास या पानावर दुरुस्ती करा व नष्ट करा असे दोन बटने दिसतील तसेच आपल्या स्क्रीनवर तुम्ही भरलेली पीक माहिती ४८ तासांच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकता असा मॅसेज दाखविला जाईल जर आपणास पीक पाहणीच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास दुरुस्ती करा या बटन वर क्लिक करा.
आपणास पीक माहिती भरा या पानावर नेले जाईल. या पानावरील आपणास आवश्यक असलेली दुरुस्ती करून आपण पूर्वीप्रमाणे पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करा जर आपणास संपूर्ण केलेली पीक पाहणी रद्द करून नव्याने करावयाची असल्यास नष्ट करा या बटन वर क्लिक करा.
आपल्याला पीक माहिती नष्ट करायची आहे का ? त्याखाली नाही व होय असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपणास योग्य तो पर्याय निवडून पीक पाहणीची कार्यवाही पूर्ण करावी शेतकरी बंधूंनो एक लक्षात ठेवा ही स्वतः दुरुस्तीची सुविधा आपल्याला एकदाच वापरता येईल.