महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-२ द्वारे रब्बी हंगामातील पीक नोंदणीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे, तसेच चुकीची पीक पाहणी 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार आहे.
ज्यांना रब्बी हंगामातील पीक पेराची नोंदणी ७/१२ वर करावयाची असल्यास ई-पीक पाहणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा, ॲप मध्ये नोंदणी करा, पीक माहिती भरा व स्वयं घोषणा करून सबमिट करा. तसेच आपण भरलेली माहिती ४८ तासात आपल्या सातबारावर येणार, माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता पीक पेराची नोंद करणे झाले आणखी सोपे व सहज ते पण आपल्याच मोबाईलद्वारे त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधव दररोज ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून पिकांची नोंद करत आहे.
रब्बी हंगामातील पीक पेरा नोंदणीची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वर उपलब्ध – E-Peek Pahani Rabi Season 2022-23:
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी घेऊन आले आहे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप. अधिक माहितीसाठी आपले गावचे तलाठी किंवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. तसेच काही शंका असल्यास ०२० – २५७१२७१२ या क्रमांकावर कॅाल करून सुद्धा तुम्ही तुमच्या शंकांचे निवारण करू शकता.
ई – पीक पाहणी कालावधी:
शेतकऱ्यांनी करावयाची पिक पाहणी | |
हंगाम | कालावधी |
खरीप | 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर |
रबी | 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी |
उन्हाळी | 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल |
तलाठी स्तरावर करावयाची पिक पाहणी | |
हंगाम | कालावधी |
खरीप | 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर |
रबी | 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी |
उन्हाळी | 16 एप्रिल ते 15 मे |
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (E Peek Pahani App):
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.