महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी ॲप मध्ये उन्हाळी व संपूर्ण वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध आहे यापैकी आपणास हवा असलेल्या हंगामातील एक पर्याय निवडून आपली पीक पाहणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
15 फेब्रुवारी पर्यंत मोबाईल ॲप द्वारे रब्बी हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा अंतिम दिनांक होता. तसेच 16 फेब्रुवारी पासून मोबाईल ॲप द्वारे उन्हाळी हंगामाची पीक पाहणी सुरू झाली आहे. मोबाईल ॲप मध्ये आजपासून उन्हाळी व संपूर्ण वर्ष असे दोन हंगाम उपलब्ध झालेले आहेत. तरी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या शेतातील पिकांची नोंद महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी व्हर्जन-2.0.6 मोबाईल ॲप मध्ये करावी.
उन्हाळी हंगामातील पीक पाहणी करण्याची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर उपलब्ध – E-Peek Pahani Summer Season 2022-23:
प्ले स्टोअर वर ई-पीक पाहणी व्हर्जन-2.0.6 मोबाईल ॲप उपलब्ध आहे, प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा व आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांची नोंद करा, ॲप मध्ये पिकांची नोंद केल्यापासून 48 तासानंतर पीक पाहणी सातबारावर येते.
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी घेऊन आले आहे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप. अधिक माहितीसाठी आपले गावचे तलाठी किंवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. तसेच काही शंका असल्यास ०२० – २५७१२७१२ या क्रमांकावर कॅाल करून सुद्धा तुम्ही तुमच्या शंकांचे निवारण करू शकता.
ई – पीक पाहणी कालावधी:
शेतकऱ्यांनी करावयाची पिक पाहणी | |
हंगाम | कालावधी |
खरीप | 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर |
रब्बी | 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी |
उन्हाळी | 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल |
तलाठी स्तरावर करावयाची पिक पाहणी | |
हंगाम | कालावधी |
खरीप | 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर |
रबी | 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी |
उन्हाळी | 16 एप्रिल ते 15 मे |
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (E Peek Pahani App):
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.