कांकेर-नारायणपूर-गडचिरोली या त्रिकोणी रस्त्याच्या पॉईटपासून वांगेतूरीपासून 7 किमी असलेल्या हिंदूर गावाजवळ आज 7 वाजताच्या सुमारास पोलिस-नक्षलवद्यांमध्ये चकमक झाली.
प्राप्त माहितीनुसार, कांकेर-नारायणपूर-गडचिरोली या त्रिकोणी रस्त्याच्या पॉईटपासून वांगेतूरीपासून 7 किमी असलेल्या हिंदूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उभारलेल्या वांगेतूरी आणि गर्देवाडा पोलिस मदत केंद्राची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून बसले होते. सदर गोपनिय मिळालेल्या माहितीच्या आधारे
अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार 60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले. सदर पथक हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना अचानक त्यांच्यावर सुमारे 7 वाजता नक्षल्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्याला गडचिरोली पोलिस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता, पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत