विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये दिली जाणार आहे. 12 वी झाल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग ला मुलं जात असतात तर ते नवीन असल्यामुळे त्यांना माहीत नसते की Engineering Admission Process कशी असते परंतु तुम्ही अशा ठिकाणी आले आहात की येथे तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस सरळ आणि सोप्या मराठी भाषेत समजून सांगितली जाणार आहे.
त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.Engineering ऍडमिशन प्रोसेस दोन Engineering Admission Process पाहणार आहोत
इंजीनियरिंग बद्दल संपूर्ण माहिती
विद्यार्थी मित्रांनो आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळे शोध दररोज लागतात यात सगळ्यात जास्त वाटा हा इंजिनियर्स चा आहे. म्हणूनच इंजीनियरिंग शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे त्याला B.E व B.Tech असे म्हटले जाते.
या दोघांमधून एक कोर्स केल्यानंतर त्या व्यक्तीला इंजिनियर असे संबोधले जाते. मग या लेखात आपण हेच पाहणार आहोत की या दोघी कोर्स ला ऍडमिशन कसे घेतले जाते कशा पद्धतीने तुम्ही इंजिनिअर बनू शकता इंजिनिअर बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तर चला पाहूया.
इंजीनियरिंग ऍडमिशन संपूर्ण माहिती
Engineering ला दोन नावांनी संबोधले जाते पहिले म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B. Tech) दुसरे म्हणजे बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (B.E) हे दोघी कोर्स इंजीनियरिंग चे कोर्स असून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये यांना या दोन नावाने ओळखले जाते. B.E व B. Tech प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते याच्यात राष्ट्रीय स्तरावर दोन प्रवेश परीक्षा आहेत
JEE आणि JEE Main या दोघी परीक्षा दिल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या राज्यात तुम्ही हे दोघी कोर्स करण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालया त ऍडमिशन फॉर्म भरू शकता. याच दोघी प्रवेश परीक्षांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रात Engineering Admission साठी MHT-CET प्रवेश परीक्षा 10+12 वी झाल्यानंतर द्यावी लागते.
इंजीनियरिंग ऍडमिशन साठी लागणारी पात्रता
- Engineering Admission साठी तुम्ही 12 वी Science किंवा Engineering Diploma पूर्ण झालेला पाहिजे.
- तुमचा Diploma झाला असल्यास इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो.
- 12 वी Science झाले असल्यास इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षाला प्रवेश भेटतो.
- 12 वी सायन्स मध्ये तुमचे Phyaics, Chemistry आणि Mathematics हे तीन विषय 50% गुणांसह पास असणे आवश्यक आहे.
- तुम्ही कोणतीही एक इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे. (उदा : JEE, JEE Main & MHT-CET)
12 वी नंतर इंजीनियरिंग ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया | After 12th Engineering Admission Process in Marathi
- 12 वी झाल्यानंतर इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
- प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला तुमची रँक कळते.
- त्यानंतर Engineering Admission Councelling CAP Round साठी अर्ज करावा लागतो.
- कॅप राऊंड चा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणती कॉलेज पाहिजे त्याचा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो.
- त्यानंतर कॅपचे 3 राऊंड होतात. या कॅप राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज वाटणी केली जाते.
- कॅप राऊंड मध्ये कॉलेजची निवड झाल्यानंतर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जावे लागते.
ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Engginearing Admission Required Document List in Marathi
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला (L.C किंवा TC)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) ( जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर टोकन पावती असणे आवश्यक असेल सहा महिन्याचा आत त्याला सादर करावे लागते)
- अधिवास प्रमाणपत्र ( Domacile Certificate)
- उन्नत व प्रगत गट मध्ये मोडण्याचे प्रमाणपत्र (Non Creamy layer) (Open /General, SC, ST कॅटेगिरी साठी आवश्यकता नाही)
- दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) अपंग असल्यास लागेल फक्त
- EWS सर्टिफिकेट असल्यास
- MHT-CET निकाल/ NEET निकाल / JEE Main निकाल.
BE/B Tech बद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती.
- BE : बॅचलर ऑफ इंजीनियरिंग
- B Tech : बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी
- वेळ कलावधी : 4 वर्ष
- पात्रता निकष : 12 वी (science) किंवा Diploma
- प्रवेश परीक्षा : JEE Main/MHT-CET
भारतातील 10 मोठी इंजीनियरिंग महाविद्यालय
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकी
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपार रुपनगर
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, पटना
इंजीनियरिंग च्या 4 वर्षांचे स्वरूप
इंजीनियरिंग डिग्री कोर्स हा चार वर्षाचा असतो. इंजीनियरिंग ला सेमिस्टर पॅटर्न असते एक सेमिस्टर हे सहा महिन्याचे असते म्हणजेच चार वर्षात एकूण आठ सेमिस्टर असतात. या चार वर्षात प्रत्येक वर्षी नवनवीन विषय मुलांना असतात आणि खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या जातात. इंजीनियरिंग च्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत जसे की, कम्प्युटर इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग अशा खूप साऱ्या ब्रांचेस असून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस आढळू शकतात. या चार वर्षात थेरी क्लासेस होतात प्रॅक्टिकल क्लासेस होतात फिल्ड व्हिजिटिंग होते प्लेसमेंट साठी ट्रेनिंग सुद्धा दिली जाते काही महाविद्यालयांमध्ये त्याचबरोबर दरवर्षी प्रोजेक्ट असतो तसेच इंटरशिप होते.