ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन; व्हॉट्सअपवरही होणार शंकांचे निरसन

मुंबई : होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन करणे. त्यांना योग्य व समर्पक उत्तरे देणे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याकरिता होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे, असे महासमादेशक होमगार्ड, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सर्व मानसेवी होमगार्ड यांना काही सूचना / निवेदने करावयाचे असल्यास होमगार्ड मुख्यालयाच्या समाधान कक्षाचा व्हॉट्स अॅप क्रमांक ८३५५८६४९३२ यावर  निवेदने / सूचना सादर करता येणार आहेत. सर्व मानसेवी होमगार्ड यांचेकडुन सुचना/निवेदने समाधान कक्षास प्राप्त झाल्यावर महासमादेशक डॉ. बी. के. उपाध्याय, उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह हे व्यक्तीश: लक्ष देवून संबंधितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.

सर्व मानसेवी होमगार्ड/अधिकारी यांनी होमगार्ड संघटना सक्षम व त्याचे नाव उज्वल करण्याकरिता प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.