बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विदयुत निर्मिती केंद्रात आज बॉयलरचा स्फोट होऊन त्यातील उकळते पाणी अंगावर पडून ३ जण गंभीर भाजले आहेत.
आज सकाळी नेहमीप्रमाणे विदयुत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक बॉयलरला जोडलेल्या बीसीसी पंप हायप्रेशरने फुटला. सदर पंपातील उकळते पाणी घटनास्थळी कामाला असलेल्या कामगारांच्या अंगावर उडाल्याने ते गंभीर स्वरूपात भाजले आहेत. यामध्ये ज्युनियर इंजिनिअर विवेक धुमाळ, टेक्निशियन कुंदन पाटील (रा. उरण-डोंगरी) व लेबर विष्णू पाटील (रा. उरण बोकडविरा) यांचा समावेश असल्याचे समजते.
त्यांना त्वरित जेएनपीएच्या अंब्युलन्सने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. गंभीर स्वरूपाचे भाजले असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई अपोलो हॉस्पिटल हास्पिटलमध्ये हलविण्यात आल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते
या विदयुत केंद्रातील बॉयलरसह इतर उपकरणांची २५ वर्षानंतर तपासणी करणे आवश्यक असताना तशा प्रकारची तपासणी करण्यात आली नसल्याने सदर अपघात घडला असत्याची माहिती येथील एका अधिकान्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला