Form No 17 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. १७ (Form No 17) भरून खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन २०२३ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (Form No 17) म्हणून विद्याथ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने स्विकारण्याचा कालावधी दिनांक २९/०७/२०२२ ते दिनांक २४/०८/२०२२ पर्यंत निश्चित करण्यात आला होता.
याबाबत आपणास कळविण्यात येते की, जे विद्यार्थी उपरोक्त मुदतीत नावनोंदणी करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने (Form No 17) विलंब व अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Form No 17 विलंब व अतिविलंब शुल्कासह निर्धारीत मुदत
विलंब शुल्क | अतिविलंब शुल्क | |
---|---|---|
(इ. १० वी) | (इ. १२ वी) | (इ. १२ वी व इ. १० वी) |
प्रती विद्यार्थी रू. १००/ स्विकारून नावनोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा | प्रती विद्यार्थी रू. २५/ स्विकारून नावनोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा | प्रती विद्यार्थी प्रतीदिन रु. २०/ स्विकारुन नावनोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा |
गुरूवार दि. ०१/०९ / २०२२ ते शुक्रवार दि. ३०/०९/२०२२ | गुरूवार दि. ०१/०९ / २०२२ ते शुक्रवार दि. ३०/०९ / २०२२ | शनिवार दि. ०१/१०/२०२२ ते सोमवार दि. ३१/१०/२०२२ |
- खाजगी विद्यार्थ्यांनी (Form No 17) इ. १० वी व इ. १२ वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
- विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज (Form No 17) भरण्यासाठी संबंधित वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरणा करावा.
- विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरीता
- शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र
- आधारकार्ड
- स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा.
- ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.
- कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर / मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsory) आहे.
- संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह (Form No 17) दोन प्रतीत काढून घ्यावी.
- विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुस-या दिवशी जमा करावयाची आहेत.
- खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे
- इ. १० वी रू. १०००/- नोंदणी शुल्क + रु. १००/- प्रक्रिया शुल्क (Processing fee) + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क
- इ. १२ वी रू. ०५००/- नोंदणी शुल्क + रू. १००/- प्रक्रिया शुल्क (Processing fee) + विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क (विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे.)
- अ) माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षेस (Form No 17) प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.
ब) उच्च माध्यमिक (इ. १२ वी) प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी (Form No 17) नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्याचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्याथ्याने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा दयावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे
- इ. १० वी, इ. १२ वी सन २०२३ खाजगी विदयार्थी फॉर्म नं. १७ (Form No 17) ऑनलाईन नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card / UPI / Net Banking) व्दारे भरणे अनिवार्य राहिल. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वतःजवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात, तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा माध्यम, शाखा संपर्क केन्द्र अथवा अन्य कारणास्तव असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी.)
- दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ / कनिष्ठ महाविद्यालय / संपर्क केंद्र यांचेकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.
- विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Eligible Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र / कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी.
- पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Eligible Certificate) प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेसाठी परीक्षा आवेदनपत्र (examination application form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह निर्धारीत माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.
- खाजगी विद्यार्थी नावनोंदणी (Form No 17) करण्याकरीता अंतिम मुदत दि. ३१/१०/२०२२ असणार आहे. यानंतर दिली जाणार नाही, याची सर्व संबंधीतांनी नोंद घेवून उचित कार्यवाही करावी.