गडचिरोली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) अंतर्गत शासनाच्या निर्देनुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता निर्णयनुसार दिनांक 31 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) मार्फत महामंडळाचे एटापल्ली येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. तरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. एटापल्ली,उडेरा चे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एटापल्ली येथे महामंडळाचे खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख अमोल इंगळे यांच्याशी संपर्क साधुन खरीप पणन हंगाम 2022-23 करीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी.
तसेच खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये धान विक्री साठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच्या आ.वि.का.सह संस्थाच्या खरेदी केंद्र/उपकेंद्राशी संपर्क साधुन दिनांक 31 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे करीता सातबारा,आधारकार्ड,नमुना 8अ,बँक पासबुक व इतर आवश्यक दस्तावेज घेऊन स्वत: हजर राहुन ऑनलाईन नोंदणी करुन शासनाच्या किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा,उप प्रादेशिक व्यवस्थापक,अहेरी (उच्च श्रेणी ) बि.एस.बरकमकर यांनी कळविले आहे.