मुलचेरा:- तालुक्यातील धन्नुर आज दि.08/12/2023 रोज शुक्रवार ला कृषि विभाग च्या वतीने शेतकरी शास्त्र शास्त्रज्ञ संवाद व कापुस फरदड निर्मुलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पी. ए. बोथीकर ( किटक शास्त्रज्ञ KVK गडचिरोली ) यांनी ज्वारी, हरभरा, करडई व इतर रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ तंत्रज्ञानाविषयी व त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, ग्लायफोसेट तणनाशक वापराविषयी व त्याचे दुष्परीणाम याबद्दल मार्गदर्शन केले. कु. एस. एच. सुतार ( मंडळ कृषी अधिकारी मुलचेरा )यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी माहीती दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून श्री कालीदास कुसनाके ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास एस. एस. गरमळे कृषी पर्यवेक्षक रोहीत कोडापे कृषी सहायक व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
