खरीप हंगामाची पिक लागवड सुरु झालेली असुन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर असे आवाहन मूलचेऱ्याचे तहसिलदार चेतन पाटील यांनी केलेले आहे. त्यांनी स्वतः शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई पिक पहाणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन केले.या त्यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ अधिकारी युवराज भांडेकर, तलाठी प्रशांत मेश्राम, कृषी पर्यवेक्षक यु सी खंडारे, प्रितम आदे व शेतकरी उपस्थित होते.
