ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पीक विमा योजनेचा लाभ घ्या तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आवाहन : ३१ जुलैपर्यंत मुदत

मुलचेरा: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचितक्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम ३१ जुलै, २०२३ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. खरीप हंगाम मध्ये येणाऱ्या पिकांचा विमा काढता येईल. सन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची हेक्टर 900 रूपये विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित पीएमएफबीवाय पोर्टल,https://pmfby.gov.in/ व आपले सरकार सेवा केंद्र यांचे मार्फत विमा अर्ज करता येईल. योजनेतील सहभाग संदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.