जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन 2024 व दिनांक 01.01.2025 पर्यत पुर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करुन गृहचौकशी अहवालाच्या अधिन राहुन पुर्ण माहिती असलेल्या एकूण 224 उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार करुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या http://gadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
प्रतिक्षाधिन सुचितील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाद्वारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला/भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली सुहास गाडे यांनी केले आहे.
