ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा) मुख्य परीक्षा- २०२१ उत्तीर्ण उमेदवारांना एकरकमी रु. २५०००/ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना –

योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.

3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.

4. उमेदवार हा सदर परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र असावा/ असावी.

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे:

1. आधार कार्ड

2. रहिवासी दाखला

3. जातीचा दाखला

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

5. मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र

6. बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रह चेक)

प्रशिक्षणाच्या अति व शती:

1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 31/10/2022 आहे.

2. महाज्योती कडे अंतीम निवड झालेल्या उमेदवाराने सारथी, पुणे या कडून अर्थ सहाय्य मिळत आहे. किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अश्या उमेदवारांना सदर योजनेचा लाभासाठी अर्ज करता येणार नाही.

3. पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

4. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

अर्ज कसा करावा:

खालील महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत वर नमूद केलेली कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क करावा : 0712-2870120/21,8956775376/77/78/79/80. ईमेल आयडी: [email protected]