ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लॉयडस मेटल्सने उभारलेल्या रुग्णालयात पहिल्या बाळाचा जन्म

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये आरोग्याची भीषण समस्या लक्षात घेऊन लॉयड मेटल्सने एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे उभारलेल्या सुसज्ज रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका नवजात बाळाचा जन्म झाला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी नुकतेच रुग्णालयात जाऊन बाळाच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे.

सुरजागड परिसरातील हेडरी येथे Lloyds Metals hospital लॉयड इंन्फिनिट फॉऊंडेशनने त्यांच्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत एक सुसज्ज रुग्णालय 8 डिसेंबर 2023 रोजी नागरिकांच्या सेवेत उभारले आहे. या परिसरातील आरोग्याची समस्या सुटावी, लोकांना वेळीच उपचार मिळावे, नवजात बाळांचे जीव वाचावे याशिवाय अपघातग्रस्त लोकांवरही तात्काळ उपचार करता यावे, या उदात्त हेतूने कंपनीचे व्यवस्थापक बी प्रभाकरन यांनी या रुग्णालयाचा पाया रचला आहे. 29 जानेवारी रोजी या रुग्णालयात अजय राजेश मिन्ज व बाली अजय मिन्ज या दाम्पत्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बोडमेट्टा गावातील या दाम्पत्याने आपल्या रुग्णालयात एका बाळाला जन्म दिल्याची माहिती बी. प्रभाकरन यांना कळताच त्यांनी रुग्णायात जाऊन मिन्ज दाम्पत्याचे अभिनंदन केले.

यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणीसुद्धा केली. Lloyds Metals hospital प्रभाकरन यांनी 30 खाटांचे मल्टिस्पेशालीटी रुग्णालय हेडरी उभारल्याने या रुग्णालयात आजुबाजूच्या गावकर्‍यांच्या वैद्यकीय गरजा पुर्ण होऊ लागले आहे. या रुग्णालयात दैनंदिन वैद्यकीय उपचार याशिवाय आपात्कालीन सेवा देण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर केल्या जात असून हे रुग्णालय तज़्ज्ञ डॉक्टरांनी सज्ज आहे. या रुग्णालयाकडे स्वत: कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन जातीने लक्ष देत असून हे रुग्णालय एटापल्ली परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरले आहे.