गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली.
अहेरी:- तालुका मुख्यालयापासून ६० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असून राजाराम पासून १२ कि.मि.अंतरावर असलेल्या येरमनार ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गांवात स्वांतत्रच्या ७० वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही.या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नसून राजाराम वरून कोरेपली जात असताना दोन नाले असून पूल्या नाही त्यामुळे पावसाळ्यात सम्पर्क तुटत असतो.तसेच पिण्याचं पाण्याचा समस्या आदि समस्या असून या कडे शासन प्रशासन कडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर गांवात बैठक करून येरमनार,कोरेपली,कावठाराम,
कापेवंचा,आदि गावातील एकत्रित सभा घेवुन गांवात नागरिकांशी सखोल अशी चर्चा केले असता या गांवात निर्मितीपासून आम्ही मतदानाचा हक बजावुन लोकप्रतिनिधी निवडुन देत असतो मात्र स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात.मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत,तसेच या परिसरात धानाची शेती जास्त प्रमाणात करत असतात मात्र या ठिकाणी धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना या परिसरातून धान नेत असताना आर्थिक व मानसिक त्रास सहन करवा लागतो असल्याचं सांगितले.कोरेपली येते नागरिकांसोबत तीन-चार तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली.असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या सभेच्या अध्यक्षस्थानी येरमनारचे सरपंचा सौ.संध्या मडावी, होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष श्री.शैलेश पटवर्धन,माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,माँड्राचे सरपंच श्री.विलास मडावी,राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,उपसरपंच श्री.विजय आत्राम,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमुले,गाव भूमिया श्री.दामा गावडे,ग्रा.प.सदस्य श्री.इरपा गावडे,गिल्ला गावडे,खाँदला ग्राम पंचायतचे सदस्या सौ.जयवंता गोलेटीवार,कु.जोती आलाम,विश्रांती चालुरकर,किशोर आलाम, राजारामचे माजी सरपंच श्री.संजय पोरतेट, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माणिक मडावी,सुधाकर आत्राम,बिचू मडावी,सुरेश पेंदाम,मनोज आकदर,नामदेव पेंदाम,पांडू गावडे,मधुकर जोड़े,कैलाश झाडे,शैलेश कोंडागूर्ले,रमेश गावडे,नरेंद्र गरगम,आदि मंचावर उपस्थित होते.सभेच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री.राकेश गावडे,यांनी मानले.यावेळी गावातील नागरिक,महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते..!!