अहेरी:-
तालुक्यातील येरमनार येथील डोलू पेंटा मडावी यांच्या घराला काही दिवसा अगोदर आग लागली आणि त्या आगीत डोलू मडावी यांच्या कुटुंबातील सर्व जीवनावश्यक वस्तू, कपडे, घरातील सर्व ईतर साहित्य आणि संपूर्ण घर पूर्णपणे खाक झालं आणि डोलू मडावी यांच्या कुटुंबावर खूप मोठं संकट आले,
ही बाब गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांना माहीत होताच त्यांनी येरमनार येथील डोलू पेंटा मडावी यांच्या कुटुंबाला बोलावून 15000/- (पंधरा हजार) रुपयांची आर्थिक मदत केली आणि सोबतच त्यांना जीवनावश्यक वस्तू, कपडे,घरातील अत्यावश्यक साहित्य दिले आणि त्यांना पुन्हा सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले,यावेळी
प्रशांत ढोंगे माजी पं. स. सदस्य अहेरी,सदीप गावडे,गोसाई झाडे, गिला मडावी,बंडू आत्राम,साधू आत्राम,डोलू पेंटा मडावी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.