माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील विनय प्रदीप जेट्टी या बालकाला उपचाराकरिता केली अर्थिक मदत.!
सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र.10 मधील रहिवासी असलेलं प्रदीप जेट्टी यांचं कुटूंब मोलमजुरी करून आपलं कसंबसं उदरनिर्वाह करत आणि आपल्या परिवारा सोबत सिरोंचा येथे राहत आहे.पण प्रदीप जेट्टी यांच्या कुटूंबातील सर्वांचा लाडका लहान मुलगा विनय प्रदीप जेट्टी वर्ग 8 वा,याला अचानक पणे चार दिवसा अगोदर वात(पॅरालेसीस) झाल्याने जेट्टी कुटूंबावर खूप मोठा संकट आलं आणि संपुर्ण कुटूंब चिंतेत होत.
जेट्टी हे कुटूंब मोलमजुरी करून आपलं जीवन जगणाऱ्या,मुलाच्या उपचारासाठी आर्थिक समस्या निर्माण झाली,ही जेट्टी कुटूंबाची आर्थिक समस्या कार्यकर्ते यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहचवली,त्यावेळी राजे साहेबानी आपल्या कार्यकर्ते यांच्या हस्ते *10000/-(दहा हजार रुपये)* पाठवून विनय प्रदीप जेट्टी या लहान मुलाला उपचारासाठी जेट्टी कुटूंबाला आर्थिक मदत केली.
त्यावेळी संपूर्ण जेट्टी कुटूंबाने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आभार मानले..!!
यावेळी राजे साहेबाचे कार्यकर्ते शंकर नरहरी,सीतापती गट्टू, हरीश कोत्तवडला,रमेश मुंगीवार,मुरली मारगोनी व स्थानिक गावकरी उपस्थित होते..!