ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती

उर्स महोत्सवा निमित्ताने दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उर्स महोत्सव निमित्ताने आयोजित कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन

गडचिरोली:- जिल्ह्याच्या स्थानिक सिरोच्या येथे हजरत वली हैदर शाह उर्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो.उर्स महोत्सवामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहभाग घेत असल्याने हा उर्स एकात्मतेचा प्रतीक मानला जातो.उर्स महोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे.

उर्स महोत्सव निमित्ताने गडचिरोली जिल्हा वासीयांसाठी मोठी जत्रा सिरोंच्या येथे भरली जाते.उर्स संदल,कुराण पठण,ध्वज चढविणे आणि कव्वाली कार्यक्रमासाठी महाराष्ट्र,तेलंगणा, छत्तीसगडसह कानाकोपऱ्यातुन सर्व जाती व धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला भेट दिली आणि दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतले.त्यावेळी उर्स महोत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचं पुष्गुहार देऊन स्वागत केल.त्यावेळी राजे साहेबांनी तेथील भाविकांना उर्स महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

उर्स महोत्सवा निमित्ताने सुरू असलेल्या कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला मस्जिद दरगहा कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!