ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांची विवेकानंदपूर,भवाणीपुर,खुदिरामपल्ली,श्रीरामपूर व गोविंदपूर येथील माँ काली माता मंदिराला दिली भेट

माँ काली मातेची पूजा करून घेतले दर्शन

मूलचेरा तालुक्यातील बंगाली बहुल भागात मोठ्या उत्साहात दरवर्षी दिवाळी व भाऊबीज यांच्या पावन महोत्सवा निमित्ताने माँ काली मातेची प्रतिष्ठापना करून बंगाली बांधव मोठ्या भक्ती भावाने काली मातेची पूजा अर्चना करतात.
माँ काली माता महोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने भक्तीमय संगीत, भजन, कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजित केले जातात.
माँ काली माता महोत्सव निमित्ताने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी विवेकानंदपूर,भवाणीपुर,खुदिरामपल्ली,श्रीरामपूर व गोविंदपूर येथील माँ काली माता मंदिराला भेट दिली.काली मातेचे दर्शन घेत पूजा करून आशीर्वाद घेतले, त्यावेळी काली माता पूजा कमिटीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भागवत कथा कार्यक्रमाचा उद्घाटन राजे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.आणि भागवत कथा कार्यक्रमाचा आस्वाद घेत आनंद द्विगुणीत केला.तसेच तेथील गावकऱ्यांना व कार्यकर्ते यांना दिवाळी व भाऊबीज च्या शुभेच्छा दिल्या.
तसेच भवाणीपुर येथील भाजप कार्यकर्ते अशोक मुजुमदार यांचं निधन काही दिवसा अगोदर झालं,यांची माहिती मिळताच त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाला सांत्वन करत भेट दिली.
यावेळी भाजपचे मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,महामंत्री विजय बिश्वास,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,उपसरपंच तापन मलिक,जिल्हा सचिव बादल शाह,महामंत्री निखिल हलदार,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,युवा मोर्चा अध्यक्ष किशोर मल्लिक,नगरसेवक दिलीप आत्राम, गुलशन मलेमपल्ली तसेच गावकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.