सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 (चौतीस) विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप.!!
गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती,पण आर्थिक प्रश्न ? निर्माण असल्याने तेथील विद्यार्थी चिंतेत होते,पण ही बाब सिरोंचा येथील जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांना कळताच त्यानी विद्यार्थ्यांनची भेट घेतली व विद्यार्थ्यांची त्यांची समस्या जाणून घेतली.
जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी ही विद्यार्थ्यांनची समस्या माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहचवली,तेव्हा राजे साहेबानी विद्यार्थ्यांनची समस्या जाणून घेत, सिरोंच्या येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34(चौतीस)विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देण्यात आले, त्यामध्ये, टी-शर्ट, व्हॉलीबॉल, नेट आणि इतर काही वस्तू वाटप केले, त्यावेळी विद्यार्थ्यांनाच्या चेहऱ्यावरीला आनंद पाहण्यासारखा होता.
अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असतात आणि क्रिडा क्षेत्रात जाऊन विद्यार्थी आपलं आयुष्य घडवतील यासाठी प्रेरणा देत असतात.
यावेळी जगदंब फाउंडेशन सिरोंचा अध्यक्ष हरीश कोत्तावडला ,उपाध्यक्ष दिनेश सुनकरी, सचिव नागराजू मेडारपु, कोषाध्यक्ष शेखर मंबु,भाजप ज्येष्ठ नेते बापन्नाजी रंगूवार भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप सेनिगारपू, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार,सितापती गट्टू ,मुरली मार्गोनी,रवींद्र आकुदरी, राजेश सुनकरी ,शिरीष बेहेरी, रोहन तोटा,रवी कुमार पेयाला हे उपस्थित होते..!