गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वाघाच्या हाल्यात ठार झालेल्या रमाबाई शंकर मुंजनकर यांच्या कुटूंबाला सांत्वन करत दिली भेट. मुंजनकर कुटूंबाला केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत. नरभक्षक वाघाला जेरबंद करणारे वन विभागाचे पथक मूलचेरा येथे दाखल.

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वाघाच्या हाल्यात ठार झालेल्या रमाबाई शंकर मुंजनकर यांच्या कुटूंबाला सांत्वन करत दिली भेट.

मुंजनकर कुटूंबाला केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.

नरभक्षक वाघाला जेरबंद करणारे वन विभागाचे पथक मूलचेरा येथे दाखल.

मुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोळसापूर येथील रमाबाई शंकर मुंजनकर वय 55 वर्षे या 15 जानेवारी रोजी त्या नेहमी प्रमाणे आपल्या गावालगतच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या त्यावेळी वाघाने अचानक त्यांच्यावर झडप मारली,त्यांच्या मानेवर व हाताला जबर जखमी झाल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला.

ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना मिळताच त्यांनी काल रमाबाई शंकर मुंजनकार यांच्या कुटूंबाची सांत्वन करत भेट घेतली आणि त्यांच्या कुटूंबाला 10000/-(दाह हजार रुपये) आर्थिक मदत केली.

आपण वन विभागाच्या वतीने मुंजनकार कुटूंबाला 25 लाख रुपये भरपाई लवकर मिळतील आणि त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त वन विभागाच्या मार्फत लवकर होईल असे आश्वासन त्यावेळी मुंजनकर कुटूंबाला दिले.

काही दिवसा अगोदर अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा मंडल या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.त्यावेळी माजी तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची नागपूर येथे भेट घेऊन अहेरी व मूलचेरा तालुक्यातील त्या नरभक्षक वाघाला जेरबंद लवकर करण्यासाठी मागणी केली होती.

त्यावेळी राज्याचे वन मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वाघाचा बंदोबस्त करा अशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्यामुळे काल वाघाला जेरबंद करणारे वन विभागाचे पथक दाखल झाले.आणि वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजीव सरकार,शहर अध्यक्ष दिलीप आत्राम,जिल्हा सचिव बादल शाह,महामंत्री सुभाष गणपती, तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे तसेच स्थानिक गावातील नागरिक उपस्थित होते..!