ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील अनेक मुलांना केली आर्थिक मदत

क्रीडा स्पर्धकांना जोडे(शूज) खरेदीसाठी मिळाला आधार

 सिरोंचा:-गडचिरोली पोलीस दलातर्फे दरवर्षी गडचिरोली महोत्सव तथा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात.त्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वचं तालुक्यातील क्रीडा स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

सिरोंचा तालुक्यातील अनेक मुले कबड्डी या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावी मोकळ्या जागी कबड्डी सराव करत आहेत.पण सराव करतांना खूप अडचणी त्यांना होत आहे. कारण त्यांच्या पायाला जोडे(शूज) नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने महागडे जोडे(शूज) पायात घालून आपला सराव करणे व कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना अडचण निर्माण झाली होती.

ही माहिती सिरोंचा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेट चे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना सांगितली त्यावेळी राजे साहेबांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून *15000/-(पंधरा हजार रुपये* ) किंमतीचे जोडे(शूज) खरेदी करून देत त्यांना मदत केली.

कबड्डी या क्रीडा स्पर्धेत यशस्वी होऊन आपल्या क्षेत्राच नाव लौकिक करा असे म्हणत पुढील वाटचालीसाठी राजे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिरोंचा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,क्रीडा स्पर्धक उपस्थित होते..!