विधिवत पूजा-अर्चना करून घेतले गणेश मंडळाचे दर्शन.
मूलचेरा तालुक्यातील गोमनी व मथुरानगर या गावी मोठ्या उत्साहात दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो,त्यानिमित्ताने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी तेथील गणेश मंदिराला भेट दिली,त्यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजे अंब्रिशराव आत्राम यांचे स्वागत केले, राजे साहेबांनी श्री गणेशाची विधिवत पूजा-अर्चना केली आणि गणेश मंडळाच्या पदाधिकारी व स्थानिक गावकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले,
संपूर्ण देशात गणेशोत्सव साजरा होत आहे आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील (अष्टविनायक) गणपतीची पूजा खूप प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो.महाराष्ट्राच्या अनेक शहरांत भव्य-दिव्या गणेश मंडळ आयोजित केले जातात आणि तसेच आपल्या गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सव थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पुढे बोलताना ते म्हणाले श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत,त्यांच्या आशिर्वादाने आपल्या गावातील आपल्या समाजातील सर्व विघ्न दूर वोहो,आणि सर्वांच्या घरी सुख शांती समाधान येवो,गणेशोत्सव निमित्ताने आपण सर्व इथे एकत्र आलो आहोत, सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो, श्री गणेशाच्या आशिर्वादाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो,असे मत यावेळी त्यानी व्यक्त केले,आणि गणेश मंडळा तर्फे सुरू असलेल्या डान्स प्रोग्राम पाहत आनंद व्यक्त केला.
यावेळी युवा नेते अवधेशबाब आत्राम, सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,भाजप जिल्हा सचिव सुभाष गणपती,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,तालुका उपाध्यक्ष विजय बिश्वास, महामंत्री अशोक बडाल,सरपंच उमेश कडते, ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे, किशोर मल्लिक तसेच गोमनी व मथुरानगर येथील गणेश भक्त आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!