हजारो गावकर्यांची उपस्थिती
मूलचेरा:-
स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बंगाली बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या सुंदरनगर ग्रामपंचायत येथे तुळशी विवाहाच्या पावन पर्वावर स्थानिक राधाकृष्ण मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राधाकृष्ण कीर्तनाचा आयोजन स्थानिक गावकऱ्यांनी केला होता, त्या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी भेट दिली तेथील राधाकृष्ण कीर्तनाचा व रासलीला उत्सवाचा आनंद घेतला आणि गावकऱ्यांच्या आग्रहाने महाप्रसादाचा आस्वाद घेत आनंद द्विगुणीत केला, त्यावेळी भवणीपुर, खुदिरामपल्ली,भगतनगर,तरुण नगर, श्रीनगर, देवनगर,गणेशनगर, गोमनी,विवेकानंदपूर येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच स्थानिक गावकऱ्यांची आणि कार्यकर्ते यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न राजे साहेबांनी जाणून घेतले, स्थानिक कार्यकर्ते यांच्या घरी भेट दिली,त्यावेळी अहेरी इस्टेट चे राजकुमार अवधेशबाबा आत्राम,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता,जिल्हा सचिव सुभाष गणपती,बंगाली आघाडी जिल्हा महामंत्री बिधन वैद्य, उपाध्यक्ष विजय बिश्वास,युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, महामंत्री निखिल हलदार, विवेकानंदपूर ग्रामपंचायत उपसरपंच तपन मल्लिक,ग्रामपंचायत सदस्य बादल शाह, नगरसेवक दिलीप आत्राम,गणेश गारघाटे,अक्षय चौधरी,किशोर मल्लिक,उमेश सरकार,उत्तम शर्मा,गणेश बँकांवार, प्रफुल दुर्गे,बडाल काका, तसेच स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती, राधाकृष्ण मंदिर समितीचे पदाधिकारी,गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.