५ ते १२ जानेवारी दरम्यान पुणे येथील बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा माजी विद्यार्थी गौरव हिचामी यांनी ४८ कि. वजन गटामध्ये वुशू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. राज्य भरातून आलेल्या स्पर्धकांपैकी वूशु स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये नागपूर व मुंबई येथील स्पर्धकाला २.५ मिनिटांच्या कालावधी मध्ये नमवून गौरवने रजत पदकावर आपले नाव कोरले , गौरव च्या या यशाने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवाय त्याची सिनिअर नॅशनल लेव्हल, व एशियन गेम करिता निवड झाली आहे . त्याच्या या यशाचे जिल्हा भरात कौतुक होत आहे. भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीच्या अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर (आत्राम), मार्गदर्शक ऋतुराज हलगेकर , गोंडवाना सैनिकी विद्यालचये प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे प्रशान्त मस्कावार, रवींद्र कोरे यांनी गौरव हिचामीचे अभिनंदन केले आहे. या प्रसंगी रजत पदक विजेता गौरव हिचामी व त्याचे मार्गदर्शक योगेश चव्हाण, यांचे उपस्थित मान्यवर गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे प्रशान्त मस्कावार, रवींद्र कोरे व सुभेदार हरिप्रसाद ध्यानी १९ महार रेजिमेंट मेघालय, हवालदार होमदेव मोटघरे ९ मराठा हिमाचल प्रदेश व विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा अभिनंदन व सत्कार करण्यात आला.